MACHINE TRANSLATION

मराठी भाषेचे विश्व आणि अस्तित्व

माझ्या म-हाठीचिये बोल कवतिके।
परि अमृतातेही पैजा जिंके।
ऐसि अक्षरे रसिके। मेळवीन॥
– संत ज्ञानेश्वर

मराठी भाषेचे आद्यकवि अाणि थोर संत ज्ञानेश्वर ह्या अभंगातून मराठी भाषेची थोरवी सांगुन गेले आहेत. ह्या अभंगामध्ये ते म्हणतात की मराठी भाषेचा गोडवा मी माझ्या अक्षरांमध्ये असा ओवेन की ती अमृताशी ही पैज जिंकेल.

मराठी ही भारतातील 22 प्रमुख भाषांपैकी एक आहे. इंडो-यूरोपीय कुलातील ही भाषा 9 व्या शतकापासून प्रचलित आहे. महाराष्ट्राची ही राजभाषा गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली येथे इतेरेतर राज्यभाषा म्हणूनही वापरली जाते. याशिवाय मराठी भाषेची पताका मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा झळकते आहे. तसेच जगभरात विखुरलेल्या मराठी भाषिकांमुळे आज मराठी मौरीशस, इस्त्रायल,अमेरिका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड,न्यू झीलंड आणि जर्मनी इत्यादी देशात कमी अधिक प्रमाणात बोलली जाते.

मराठी भाषा भारतासहित विदेशात कशी हे जाणण्यासाठी आपल्याला इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. मराठी खासकरून संस्कृतपासून आलेल्या महाराष्ट्री प्राकृत आणि अपभ्रंश या मधून निर्माण झाली. तिची कीर्ती हि सर्वदूर पसरवण्याचे कार्य आपल्या संतपरंपरे सहित बाहेरच्या राज्यात जाऊन चढाया करण्याऱ्या राजा आणि सैनिकांना जाते. त्याच प्रमाणे इथे येऊन राहून, इकडीची संकृती भाषेसाहित आपलीशी करण्याऱ्या माणसांना सुद्धा.

इस्र्यालय चे नागरिक महाराष्ट्रात येऊन तेली व्यवसाय करताना इथेच स्थ्यायिक झाले तसेच इकडचे सैनिक, माणसे इथून छत्तीसगढ, गुजरात मध्ये. भक्ती परंपरेच्या अंतर्गत संतांनी मराठी भाषा जी जनमाणसाची भाषा होती तिला आपले विचार- शिकवण पुढे घेऊन जाण्यासाठी वापरले. इथून नामदेव शीख धर्मगुरुंच्या बरोबरीने प्रवास करताना मराठीची गोडी आपल्यासोबत घेऊन घेले. आजही गुरु ग्रंथसाहिब या शिखांच्या धर्मग्रंथात नामदेवांची एकूण 61 पदे आहेत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मराठी मध्येच ओविली. महानुभावपंथाचे श्री चक्रधर स्वामी यांनी सुद्धा पूर्ण महाराष्ट्रभर एकट्याने भ्रमंती करत असताना मराठी भाषेतून लोकांशी संवाद साधला. लीळाचरित्र हा मराठीतील पहिला आद्यचरित्रग्रंथ चक्रधर स्वामीं बद्दल असून त्यांच्या या भ्रमंतीचे सुद्धा वर्णन करतो. संत यांच्या बरोबरीने लोककलावंतांनी देखिल मराठी भाषा समृद्ध केली, तिची जपणूक केली.

शिवाजी महारांजानी डच यांच्या बरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार केला तसेच महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या प्रदेशातून व्यापारासाठी व्यापारी आणले तसेच माणसे नियुक्त केली. या व्यापारामुळे भाषेची सुद्धा देवाण घेवाण झाली. तसेच संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत गुजरात अणि कर्नाटकातुन वैश्य समाजाचे व्यापारी महाराष्ट्रात येउन इकडचे झाले.

मराठी ही एक अशी भाषा आहे जी वळवावी तशी वळते. मराठीतील म्हणी, दुसऱ्या भाषेतील मराठीने आपलेसे केलेले शब्द, जागेगणिक बदलत जाणारे हेल, उच्चारांवर बेतलेल्या बोली अणि पोट भाषा हा तिच्यातील गोडवा अणि रांगडेपण दोन्ही अधोरेखित करतात.

कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. अक्षी, अलीबाग येथील यादव रामचंद्रदेवाचा गद्धेगाळ कोरलेला शिलालेख तसेच कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या पायाशी कोरलेला लेख हे दोन्ही मराठीतील प्रथम शिलालेख मानले जातात.

कवी सुरेश भट यांनी फार सुंदर शब्दात मराठीचा गोडवा वर्णला आहे
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

सोबत थॉमस जेफरीचा मराठा साम्राज्याचा 1768 मध्ये बनवलेला नकाशा जोडला आहे.

1. इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी
2. सोशल एंड इकनोमिक कंडीशन
http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/41801/10/10_chapter%20iv%20social%20and%20economic%20conditions.pdf
3. ऑफ ट्रेड ट्रेडर्स एंड पॉलिटिक्स: व्हाट डीड शिवाजी एंड वीओसी से तो ईच अदर?: निखिल बेल्लारीकर
4. शिवाजी एंड सूराज: अनिल माधव दवे
5. मराठी भाषेचा इतिहास, विकिपीडिया.
6. http://www.marathiworld.com/
7. फार्मेशन ऑफ मराठी लैंग्वेज: जे. ब्लोक
8. https://web.iiit.ac.in/~sarvesh.ranadeug08/project/Literature.html

Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


© - 2017 All content on this website, such as text, graphics, logos, button icons, software, images and its selection, arrangement, presentation & overall design, is the property of Indoeuropeans India Pvt. Ltd. and protected by international copyright laws.